N
Nisha Das
Friendship · Marathi · Friendship
नैना नैना,नैना,नैना ही कोण आता नवी मैना? माझ्या झोपेची उडवली दैना काय करावे काही सुचेना... ’राधा,ज्युली,गुड्डी,शबाना’ यांना दिला म्ह्णे तुम्ही तलाकनामा! अहो,आता तरी ऎका ना, पोरी फिरवणं सोडून द्याना दोन दिवसांच्या मजेत बायकोला असं विसरु नका ना... ती सप्तपदी, त्या आणाभाका सात जन्माचं बंधन असं तोडू नका ना... "अगं माझे आssई आता बस झालं बरं... रडणं,ओरडणं,तुझं थांबव तर खरं, भिंतीवर नुसतं टांगायचच नसतं, तर कधी कधी ’बघायचही’ असतं ’कॅलेंडर’ ’एप्रिल फुल’ चा दिवस तू आज विसरलीस तरी कशी? अगं,मित्रांनी घेतली माझ्या,तुझी फिरकी खाशी" अगं बाई,खरच की,आजचा दिवस मी विसरले तरी कशी? तरीच म्हटलं ,मला विसरण्याची हिंमत्त, तुमची अशी,झालीच तरी कशी? -कवयित्री ज्योती कपिले. मनमुक्ता काव्यसंग्रहातून
65 likes
13 shares