नमो नमो नमो मोदी सरकार , न.मों.चा सर्वत्र जयजयकार ..... जय जवान जय किसान कष्टकऱ्यास मान किमान नतद्रष्टांच्या मनात हाहाकार न.मों. चा सर्वत्र जयजयकार ....... भेदभाव न उरेल आता राव-रंकात येई समता बाद करता पाचशे नि हजार न. मों.चा सर्वत्र जयजयकार ....... लाचखाऊंची पहा लाचारी पैसे वाले जाहले आजारी नष्ट होईल समूळ भ्रष्टाचार न. मों.चा सर्वत्र जयजयकार ....... बाहेर पडेल पैसा काळा लाचखोरीस बसेल आळा आता होणार रामराज्य साकार न. मों.चा सर्वत्र जयजयकार ....... संपेल खंडणी, साठेबाजी उठेल लहर आनंदाची जनजीवना मिळे नवा आकार न. मों.चा सर्वत्र जयजयकार .......
19 likes
69 shares