नमस्कार आपण नेहमीच आपल्या व्यक्तिगत कामात व्यस्त असतो.आपल्याच कोशात रहावे, जे जमेल ते करावे हा मनोदय आपण जपतो.जीवनावर प्रेम करणारी माणसे नेहमीच आनंदि असतात. हास्य हा त्यांचा जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो.संकट ही अपूर्व संधी आहे असेच त्यांचे मत असते.आपले मात्र याउलट असते. सामान्य मनुष्य जसा वागतो तसे आपण जगतो हे नकळत आपल्याच हातून घडते. वर्तनाचा विचार करावा आणि त्यानुसार जीवनक्रम ठरवावा. प्रसन्नतेंला प्राधान्य द्यावे चार दिवसाच्या या जीवनात निखळ आनंदी राहणे सहज शक्य असते. परंतु आपण असा आशावादी विचार करत नाही अशा लोकाना संत तुकारामाने उदासीनतेंचे विचार वेचायला सांगितले आहेत. आपण जगात काही भर टाकत नसतो आणि काही घेत ही नसतो.वर्तमानात आपण समाधानी असणे जगाच्या समाधानासाठी प्रयत्न करणे याचा विचार आपण आपल्याच काळजात पेरायला हवा. हा विचार एकदा स्वीकारला की मग सगळे व्यवस्थित होत असते. जीवन सुंदर आहे ते अधिक सुंदर होईल जेव्हा आपण एकदाही चेहऱ्यावरून हास्य हरवू देणार नाही.आपले हास्य सदोदित रहावे यासाठीच हा अट्ठाहस......
221 likes
48 shares