नमस्कारचे सुद्धा आता तुकडे पडलेत... "जय जिजाऊ", "जय भीम","जय भगवान", "जय मल्हार","जय रोहिदास", "जय राणा"... सकाळ सुद्धा आता *"जात"* घेऊनच उगवते... "शिवसकाळ", "भिमसकाळ", "लहूसकाळ"... समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता *"जात"* सांगून टाकतात... "शिवकवी", "भीमकवी", "मल्हारकवी"... वादळं सुद्धा आता *"जात"* घेऊन येतात "भगवं वादळं", "निळं वादळं","हिरवं वादळं", "पिवळं वादळं"... रंगात विभागलेत आता पाऊस, वारा, वादळं, शहरातली दुकाने अन्... गावच्या वेशीसुद्धा...! पण ... रक्ताचा "रंग" मात्र अजूनही *"लालच"*..............! 😔😔😔 👍🏼👍🏼 करा यावर मात, *""मनुष्य हीच खरी आहे जात""* ,, नाहीतर देश जाईल धूळ खात ,,, या वर करा मात ,, *भारतीय हीच आपली जात*
23 likes
80 shares