Back to feed
A
Atharv Patel Life · Marathi · Life

नॉर्मल ! रस्त्यांत चालताना कचऱ्याचा ढीग दिसला की लावतेच ती रुमाल नाकाला एखादा अपघात बघितला की जीव घाबरा घुबरा होतो तिचा दरवाजात भिकारी काही मागायला आला की जेवणावरून उठून वाढते त्याच्या थाळीत एखादी पोळी टीव्ही सीरिअल चालू असताना एखादा मृत्यू दाखवला की तीही रडते त्या घरातल्या माणसांसोबत अगदी हुंदके देत देत एखादी आनंदाचा सिन आला की खुलते तिची ही कळी आपसूक आणि ह्या सगळ्या गोष्टींवर त्याची एकच प्रतिक्रिया असते तिच्या अंगावर खेकसून ओरडतोच तो दरवेळी " दुर्लक्ष करायचं असतं अशी काय रिऍक्ट होतेस दरवेळी ? जरा नॉर्मल रहा की ! खेडेगावातून अचानक लग्नानंतर या नवीन शहरात आलेली ती आज ही याच संभ्रमात आहे तिला उत्तर सापडत नाही काही की आपल्या दोघांपैकी "नॉर्मल" नक्की कोण नाही ?

213 likes 77 shares
WhatsApp