Back to feed
M
Myra Malhotra Patriotic · Marathi · Patriotic

नवी दिल्ली, दि. २ - देशातील उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार मोठया पगाराच्या नोक-या मिळत नाहीत हे आजचे वास्तव आहे. त्यामुळेच तिहार तुरुंगात उच्चाशिक्षित पदवीधर तरुणांना आज तुरंगरक्षक, वॉर्डर्स सारख्या पदांवर नोकरी करावी लागत आहे. देशातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहार तुरुंगात यावर्षी ५९ तरुण-तरुणी नोकरीसाठी रुजू झाले. त्यातील पाच इंजिनिअर, चार एमबीए तर अन्य विज्ञान, वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. तुरुंगरक्षक, वॉर्डर्स ही छोटी पदे असून त्यासाठी १२ वी उर्तीण एवढीच शैक्षणिक पात्रता लागते. तिहार तुरुंगातील ही नोकरभरती सध्याचे वास्तव चित्र दाखवणारी आहे. तुरुंग रक्षक आणि वॉर्डर्स म्हणून नोकरी स्वीकारणा-या या तरुण-तरुणींना ५२०० ते २०२०० रुपयापर्यंत वेतन मिळेल. ही दिल्ली सरकारमधील ड्रायव्हर, ज्युनियर कारकूनाशी मिळती-जुळती वेतनश्रेणी आहे. तिहार तुरुंगातील पदासाठी एकूण ४५ हजार अर्ज आले होते.

129 likes 54 shares
WhatsApp