Back to feed
A
Aadhya Bose Life · Marathi · Life

.. , "नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात अविश्वास ठराव 105 विरुद्ध 06 मतांनी मंजूर". दोन मिनिटे शांत बसल्यावर असा विचार मनात आला की, ज्या स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास करतोय त्यात निवड होऊन जर प्रामाणिक पणाची अशी गत होत असेल तर त्याचा उपयोग काय? ग्रीक तत्वज्ञ *प्लॅटो* म्हणतो, "लोकशाही म्हणजे "Rule of ignorance" जिथे धूर्त राजकारणी लोकांना अज्ञानाचा फायदा घेऊन स्वार्थ साधतात. आपल्या जेमतेम सहा महिन्यांच्या कार्यकाळात नवी मुंबई मनपा आयुक्तांनी तेच केले जे त्यांचे काम होते.स्वच्छ कारभार व भ्रष्टाचाराला विरोध हीच त्यांची चूक..अविश्वास ठरावाचा मसुदा पाहिला कि नगरसेवकांच्या हेतूवरच शंका उपस्थित होते. अविश्वासाची कारणे- १)लोकप्रतिनिधींना मान देत नाहीत २)मनमानी कारभार करतात. म्हणजे आता Public good (लोकहित) पेक्षा नगरसेवकांच्या ego ला जास्त महत्व द्यायचे का? वरुन शिवसेनेचा पहिल्या रांगेतील एक नगरसेवक ठराव झाल्यावर सभागृहात बोलतो, "मुंढे उठा अन निघा आता"... अशी यांची मग्रूरीची भाषा. महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने (शिवसेनेने) अविश्वास ठराव आणला व सत्ताधारी राष्ट्रवादीने त्याला समर्थन दिले. चांगल्या मुद्द्यावर यांना कधी एकत्र येता येत नाही. उदा. GST bill, महिलांना संसदेत आरक्षण ई. पण यांची अनधिकृत बांधकामे जात असतील तर मात्र हे एकत्र... एका खोलीत यांच्या बैठका... म्हणजे जनतेला सरळ वेडे समजले जाते की, अजून 3.5 वर्षे म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत तुम्ही आमचे काही करू शकत नाही. (कारण राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा म्हणजे Right to recall कायदा नाही.) शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना चांगलं माहित आहे की, *जनतेची स्मरणशक्ती* हि खूप अल्पकालीन असते. निवडणूक आली की "इस्लाम खतरे मे" असे म्हणत काँग्रेस तर. "मुंबईत शिवसेना नसेल तर मराठी माणूस हद्दपार होईल", "हिंदू खतरे मे है" असे म्हणत शिवसेना भावनिक खेळ खेळून मते मिळवतात. धर्माच्या, जातीच्या नावावर Divide and Rule (फोडा आणि राज्य करा) हि यांची धोरणं. म्हणूनच कार्ल मार्क्स म्हणतो कि, "धर्म हि अफूची गोळी आहे". याच अफूच्या गोळीचा राजकारणात अस्त्र म्हणून वापर करून लोकांना वेड्यात काढलं जात. मग ते शिवसेना असो की राष्ट्रवादी, हातात हात घेऊन लोकांना लुटत राहतील.विकास कुणालाच नकोय.कारण जनता झोपलीय ना... राष्ट्रवादीच तर राजकारणच पैसा, घराणेशाही,धोपटशाही भोवती फिरते. मला विशेषतः शिवसेनेची कीव येते स्वतः च्या तत्वांशी तडजोड करून जनमताचा अनादर करून भ्रष्ट नगरसेवकांना पाठीशी घालून पक्ष नेतृत्वाने पण आपली बौद्धिक कुवत व स्वार्थीपणा दाखवला आहे. सत्तेसाठी हे ज्यांच्या जीवावर निवडून येतात, त्यांच्या भावनांना पायदळी तुडवायला हे मागे पुढे पाहत नाहीत. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की यात मुंढेंच काहीच नुकसान नाहीये कारण *मुंबई महानगर पालिका अधिनियम 1949* नुसार त्यांची बदली *बढती* देऊन होणार आहे.नुकसान शेवटी जनतेचेच. हा लढा "मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी" नसून "जनता विरुद्ध लोकप्रतिनिधी" असा आहे. जर आपल्याला १०० स्मार्ट शहरे करायची असतील तर असे १०० तुकाराम मुंढे लागतील. आता अपेक्षा एवढीच की, मुख्यमंत्री राजकारणाला बळी न पडता सद्विवेक बुद्धीने यावर निर्णय घेतील.आज वेळ आली आहे की नागरिक म्हणून मुंढेंच्या मागे ठाम उभे राहण्याची कारण प्रश्न मुंढेंचा नसून लोकशाहीवरील विश्वासाचा आहे. "पुन्हा एक तुकाराम, व्यवस्थेशी लढतोय अभिमन्युप्रमाणे चक्रव्युहात , चार जणांशी भिडतोय."

84 likes 14 shares
WhatsApp