निवांत झाल्यावर नक्की वाचा...🙂🙂🙂 आयुष्य कठीण अजिबात नसतं . . कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . . कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . . कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . . कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . . कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . . कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . . कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . . कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . . कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . . कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . . कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . . कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . . कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो . . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?? ताण घेतला तर तणाव . . आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते . आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्....... *या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं* 🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐.
36 likes
67 shares