*नव-याच्या शिव्या मार खाऊन तोच नवरा सात जन्मासाठी मागणा-या माझ्या थोर मैत्रीणींसाठी....* वयाच्या चौदाव्या वर्षी न्हानं आलं, पंधराव्यात लगिन झालं.घरची गरिबी म्हणून बा नं नक्षत्रावाणी पूरीला सवतीवरच दिलं.नव-याचं वय चौतीस वर्षे.टोपलंबर डाग घातलं सासूनं सुमीला.चार वर्सात दोन पोरं झाली.सगळ्याला वायव झाला.पोरं दूद प्यायची तुटली आन् सासरच्यानी सुमीला कार करायला सुरू केला.पोरं होस्तोर तुपात भाकर खायाला देणारी सवत आता तांबड्या चटणीचा भुकटा द्यायला लागली.धुणं,भांडी,सारवन,दळण अन् गुरासारखं रानातलं काम हीच सुमीचं जगणं झालं.कामात जरा कसूर झाली की नव-यादिराच्या लाताबुक्क्याचा परसाद मिळायला लागला. पोरं बी आता सवतीलाच आय म्हणाय लागली.मायलेकरांची वखळ बी हू दिली नाही.एक दिशी उटायला उशीर झाला म्हणून वल्या फोकानं हाणली नव-यानं.पायावर नाक घासाय लावलं.रोजच्या कामानं,पोटाच्या आबाळीनं आन् माराणं सुमी चिपाडागत झालती.माह्यारला तिनं कायबी कळू दिलं नाही.आता सासरघरच्या इशीतनच आपलं मडं जायाचं म्हणून गपगुमान गिळत राह्यली समदं. एक दिशी बा आला पुरीची हालचाल पुसायला आन् सुमीला बगून जाग्यावरच बसला.इलाजानं सुमीकडनं सगळं काडून घेतलं.गडीमाणसं घरी नाह्यती तवर सुमीला घिवून तालुका गाठला.स्टेशनात तकरार दिली.पुलीसांनी धरून आणल्याली माणसं पैसं भरून चार दिसात सुटून गिली. तवापसनं म्हंजी पंचवीस वर्सापसनं सुमी माह्येरात हाय.आदी बापाकडं हुती.बापामाघारी इकटीच करून खाती कामाला जावून. परवा दिशी नटूनथटून वड पुजायला जाताना दिसली.
K
Krishna Malhotra
Friendship · Marathi · Friendship
27 likes
62 shares