नशिब बिशिप म्हणजे काय हे मला कधीच कळत नाही एवढच मला माहिती आहे कीं माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही मनात येतो कधी एक विचार पण घडत मात्र , दुसरच काही बाही अस का होत , हे मला माहिती नाही माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही कोणत्या गोष्टीसाठी , जीवाचा केला आटापिटा कुठे काय चुकत, आणि होतो त्यात घाटा माझा दोष मी, नशिबाला देत नाही पण.. माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही माझ्या करतुतीचे खापर मी स्वत:वरच फोडत राही मीच पेरलेले उगवत , हे मला पटत नाही माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
19 likes
35 shares