*पु. ल. म्हणतात -* *खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.* *प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.* *ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.* *शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.* *माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.* *बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.* *खरं तर सगळे कागद सारखेच.* *त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.* *रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.* *पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.* *आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.* *सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.* *कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.* *रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.* *आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.* *ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.* आयुष्य फार सुंदर आहे... *ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...* *माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे..* 🌺🌺🌺🌺
205 likes
68 shares