पाऊस .... सारे कवी कधी तरी, पावसावर लिहितात मी म्हणलो काहीतरी वेगळ करून पाहूयात पावसा वरती लिहायचे नाही, पक्कं करून ठेऊ वही पेन घेऊन, डोंगरमाथ्यावर जाऊ लिहू म्हंटल वाऱ्यावर, मन नाही थाऱ्यावर दरीतुन येणाऱ्या ढगांनी, आणले शहारे, अंगावर तेवढ्यात एक थेंब, वही वरती पडला इंद्रधनु जणु त्याच्या मध्ये अवतरला सुंदर एक पक्षी, भिजलेला आला फांदी वरती पंखझटकून, नेघुन तो गेला झटकलेल्या पंखाचे, पाणी पडले वहीवर झाली त्याची आकर्षक रांगोळी की, ही सुंदर थेंब थेंब पाण्याच्या, झाल्या आत्ता मोठ्या सरी थोडा पाऊस थांबल्यावर, डोंगर उतरून जावे घरी डोंगर उतरून खाली आलो बघूनते दृष्य मी, रडताच झालो गारपीटा नी झोपवली, उभी पिकं हाताची शेतकऱ्याने रहायचे का ? पुन्हा एकदा उपाशी कोणा साठी काय, तर कोणा साठी काय वरुण राजा तुझा असला कसला न्याय नाही म्हणुन न कळत, लिहिली कविता पावसावर पावसा वरती न लिहिणारा, कवी नाही धर्तीवर
16 likes
74 shares