पाऊस आठवणींचा पावसात एक बरं असतं भिजून घेता येतं भिजता भिजता आतुन आतून रडता येतं . कोसळता सरी ओठांवरती अधीर होते मन थेंबाथेँबातून साजरा होतो . आठवणीँचा सण ओल्या मातीत आठवणीँच्या मग रुजून येता येतं . . . भिजता भिजता . . . आठवत राहतात तिलाही मग हुळहुळणारे गाल टिचभर छत्री टपटपणारी अन् भिजलेला रुमाल चिंब ओल्या रूमालानं तिचं डोकं पुसून घेता येतं . . . . भिजता भिजता . . . . आसू हासू , आशा ,हुरहुर पावसाला सारं कळतं मेंदीभरल्या तळहातावर पावसाचं तळं जळतं विरहाची काडी सुलगावून त्यात जळून घेता येतं . . . भिजता भिजता . . . सरतो पाऊस ,फिटते धुके वास्तवाचे पडते ऊन मन म्हणते चल रे गड्या , आपल्या घरी आपणाहून पागोळ्यांचे बनुन थेंब रेंगाळत राहता येतं भिजता भिजता आतून रडून घेता येतं पावसात एक बरं असतं . . . !
0 likes
0 shares