पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला . बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो वारा पण अलगद डोलु लागतो हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला . मित्र तो , सखा तो , हळवार येतो मन प्रसन्न करुन तो आनंद देतो गरम चहाचा स्वाद तो वेगळाच देतो खिडकित बघताना तो डाळे टिपुन घेतो हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला.
226 likes
59 shares