पाऊस आलाय….थोऽऽऽडी पिऊन घ्या.....? थोडा मदिरेचा गंध घ्या थोडा चकण्याचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या.. आलाय पाऊस….. थोडीशी पिऊन घ्या बघा सागर कसा उसळतोय वारा पाणी घुसळतोय तुम्हीही पेल्यात वादळ शमवुन घ्या...... आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या सर्दी पडसे रोजचेच.. त्याला औषध तेच तेच.. प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत पिऊन घ्या.. आलाय पाऊस….. थोडीशी मात्रा पिऊन घ्या बघा निसर्ग बहरलाय गारव्याने देह ही शहारलाय मन ही थोडं मोहरून बेधुंद व्हा.... आलाय पाऊस….. जरा थोऽऽऽडी पिऊन घ्या
115 likes
84 shares