Back to feed
A
Anika Reddy Love · Marathi · Missing

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शूभ्र मावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीव सागरासारखा अथांग असावा विश्वास दुस-यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास हातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण अलगद हात हाती येतो सलते एक आठवण मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

0 likes 0 shares
WhatsApp