पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. चिमणा: "सकाळी बोलूयात",. चिमणी -"हो", तीही म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. - चिमणा उत्साहाने म्हणाला, "निघूयात? नव्यानी काड्या आणू". तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत! चल निघूयात" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली... यालाच जीवन म्हणतात.
230 likes
2 shares