Back to feed
K
Krishna Verma Love · Marathi · Rain

पहिली सर अन ती तिने विचारलं, खूप दिवस लिहिलं का नाहीस? मी म्हटलं, उकडतंय फार. सुचत नाही आणि पाऊसही नाही. म्हणाली, "अच्छा" तिच्या या "अच्छा" मधली निराशा जाणवली मला. आणि त्या निराशेचं ओठांवर न येवू देणंही. एका सकाळी आभाळ काळं झालं, दाटून आलं. अपेक्षेप्रमाणे फोन वाजला, "पाऊस पडला, आज लिहिशील ना?" मी म्हटले, "हो" ती काहीच नाही बोलली, तिचा चेहरा प्रत्यक्ष दिसत नव्हता. पण त्या क्षणी तिच्या श्वासातला गारवा जाणवला मला. समाधान कळले. पसरलेल्या मिठीत ती पावसाची सर भिजत होती. एका श्वासात दोन जीव जगतात कधीकधी.

0 likes 0 shares
WhatsApp