Back to feed
A
Avni Mishra Life · Marathi · Life

फॉर्मेलिटी. .................................................... जनमताच उघडण्याआधी डोळे फोडावेत.... रडण्याआधी जीभ छाटावी... कानात उकळत तेल ओताव... नाकाचे होल बुजवावे... हात-पाय तोडावेत... छातीवर दगड ठेवावा... पोट नायलॉन च्या दोरीने घट्ट बांधाव... लाड करावा,गालगुच्चे घ्यावे.. हत्ती वरुन साखर वाटावी... रेशनकार्ड द्यावे... नावाच्या रकान्यात डॅश मारावा... डाव्या हाताच्या बोटाला शाई लावावी... आधार कार्ड इश्यू कराव... जातीचा दाखला बनवावा... सोईनुसार कपाळाला कलर लावावा... अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा गाजावाजा करावा... मोठ्ठा फ्लेक्स लावावा... चौक सजवावा... पै-पाहुणे बोलवावे... जेवनावळी घालाव्यात... गोड-धोड, चमचमित रस्सा वाढावा... मनसोक्त वरपाव... अन्न दाता सुखी भवः म्हणाव.. अन... मयत घोषित कराव... समाधानांन आक्रोश करावा... आजुबाजुचा अंदाज घ्यावा... नदया कोरड्या कराव्यात... धरण आटवावीत... मधेच उठाव... उपकार नको म्हणून हागुन-मुतुन याव... शेवटी बारस कराव... नाव माणूस ठेवाव... पूर्णविराम.

48 likes 56 shares
WhatsApp