*बिनधास्त जगा मित्रांनो* ●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ... (कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल) ●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच (कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही ) ●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच (निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.) ●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच (सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.) *एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.* *स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा*✍
98 likes
27 shares