ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतो ????? ज्याला मराठीत प्रेम भंग म्हणतात तेचं असतं, जुळलेले अनुबंध तोडणे असतं.. कि कधी ते जूळलेचं नव्हते हे उमगणं असतं.. कुणाचा तरी निरर्थक हट्ट असतो ? कि दोघांनी मिळून घेतलेला कठोर निर्णय असतो.. त्रास सहन करायला जमत नाही तो क्षण असतो ? कि त्याग करण्याची तयारी नसायचा पुरावा असतो.. दोन जीवांची घालमेल असते ? कि कोणा एकाचं तडफडण असतं.. पुन्हा एकदा नव्याने सुरवात असते ? कि आठवणींवर जगायची तयारी असते.. ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतो ?????
0 likes
0 shares