Back to feed
R
Rohan Rao Life · Marathi · Life

बिल गेट्स यांचे 7 नियम................. नियम 1. जीवन चांगले असेलच असे नाही.त्याचा चांगला वापर करायला शिका. नियम 2. जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही.त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल. नियम 3 तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही.तुम्ही स्वतःतबदल घडवून आणले पाहिजेत.त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल. नियम 4 तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे. नियम 5 जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे. नियम 6 टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन कायआहे ते कळते. नियम 7 आयुष्यातल्या संधीकधीच संपत नाहीत. एकगेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.. :)

206 likes 43 shares
WhatsApp