Back to feed
R
Riya Yadav Life · Marathi · Life

ब्लेड ला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही!!!!! 🙏🤘👍 नक्की वाचा खूप मस्त आहे *एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.* *तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.* *त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.* *असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.* *त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.* *आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य अांधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,* *तात्पर्य :- काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.* *2) समजून घ्या सोप्प आहे.* *3) मी एकटा स्मित हास्य करू शकतो पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो.* *हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही,* *ब्लेड ला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही.* *कुर्‍हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत.* *प्रत्येकजण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा जीवन फार सुंदर आहे जगा आणि जगू द्या. 👆🏻👌👌👌👌

50 likes 76 shares
WhatsApp