Back to feed
R
Rudra Mehta Life · Marathi · Life

बुवाबाजी - भाग १० (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून) ======================================= बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद - (५) भक्ताचे दु:ख गुरु तीन प्रकारे दूर करू शकतो. असे आसाराम बापूंनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. एक ध्यान मंत्र असे आध्यात्मिक मार्ग, दोन बौद्धिक पातळीवर सत्संग, तीन गुरूच्या भोवतीचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे लोकांचे आजार बरे करण्यापासून ते आनंदलहरी कोट्यावधी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम गुरु करतो. यात काय खरे आहे ? व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा अनेक शोषणाला तोंड द्यावे लागते. त्याला ध्यान आणि मंत्र उपयोगी पडू शकत नाही. कदाचित त्याद्वारे मनात शांतता प्रस्थापित झाल्यासारखे भासेल पण खरे दु:ख निवारण होणार नाही. या कथित गुरु आणि महाराजांच्या सत्संगातील विचार हे तर बहुतांश वेळा अत्यंत असंबंध आणि अनेकदा अशास्त्रीय व दिशाभूल करणारे असतात. कोणत्याही गुरु वा महाराज याच्याभोवती कसलेही अदृश्य दैवी वलय नसते आणि त्याची कसलीही स्पंदने लोकांचे आजार बरे करू शकत नाहीत. ही अंधश्रद्धा पसरवणे हीच बुवाबाजी आहे . (क्रमशः)

234 likes 62 shares
WhatsApp