Back to feed
K
Kunal Mishra Life · Marathi · Life

बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कसलं दिखाऊ आयुष्य झालं या व्हाट्सअप मुळे उठसुठ हॅप्पी बर्थडे उठसूठ श्रध्दांजली तोंडावर नाही हास्य ना डोळ्यांमध्ये पाणी एखादेदिवशी वेळ मिळाला तर घरी जाऊन भेट मोकळा नको होऊ नुसता मारुन पॅक नेट नको रमू आभासी दुनियेत आभाळ सारे खुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले भावना बिवना काही नाही नुसती कॉपी पेस्ट तासनतास् आयुष्य नुसते घालवतो वेस्ट इकडून आला तिकडे पाठवला हेच नुसते चालते खरं किती खोटं किती कुणाला माहीत नसते बुटकं झालं आयुष्य भाऊ या इंटरनेट मुळे बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कुणी कुणी तर भाऊ कहरच करुन टाकतो इतक्या लोकांना पाठवा म्हणून शपथ देऊन टाकतो कीव वाटते "शेअर कराच" म्हणून कुणी हात जोड़तो तेच-तेच मॅसेज टाकून कुणी भंडाऊन ही सोडतो असली विचित्र दुनिया झाली आपलीच सर्व मुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कुठलीच गोष्ट वाईट नसते व्हाट्सअप ही नाही चांगला उपयोग करणे हे मात्र आपल्याच ठायी वैताग येतो कधी याचा पण उपाय दुसरा नाही नव्या जगाची नवी रीत मनी खंत मात्र राही निखळ आनंद गमावला व्हर्चुअल सर्व झाले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले

31 likes 64 shares
WhatsApp