भटकी बिऱ्हाड लेउनी पाठी, हातात घेऊनी काठी तुडवी उजाड माळ, केवळ जगण्या साठी कसली असते आशा, कसली असती नाती अंधार संपत नाहि, विझती जळून वाती. आधार कशाचा घ्यावा, लांबून साजरे दुर्ग विश्वास घातकी छाया, चोरांशी फितूर स्वर्ग. होईल पहाट केव्हा, अंधार माजला फार जाईन दुसऱ्या गावा, संपला ईथला थार. स्थावर असते काय, शाश्वत म्हणावे काय भटकी सारीच येथे, साखळ जखडी पाय.
0 likes
0 shares