Back to feed
V
Vanya Bagale Life · Marathi · Life

" भूतकाळाला चिकटून नाही रहायचं. ना भविष्यातील स्वप्नात अति रममाण व्हायचं. आज,आता आपल्या हातात काय आहे.त्यावर लक्ष केंद्रित करायचं.वर्तमानात रहायचं. म्हणजे काय होईल जो भूतकाळ आपल्या हातून सुटलाय त्याच्या ब-यावाईट आठवणीत वर्तमानातला वेळ वाया घालवून होणारं भविष्याचं मात्रं टाळता येतं. परंतु हे सांगताना मला याही गोष्टीची जाणीव आहे की माणसाचं मन त्याला फसवून कधी भूतकाळात किंवा भविष्यकाळात नेतं त्याचा त्याला पत्ताही लागत नाही.किंबहुना मनाचा या दोहोंकडेच ओढा असतो.पण मला वाटते जाणीवपूर्वक माणसानं आपल्या मनाला वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडलं पाहिजे.म्हणजे ज्या ज्या वेळी मन भूत किंवा भविष्यकाळात धाव घेईल त्या त्या वेळी सावध होऊन मनाला समज द्यायची.सुरूवातीला अपयश येईल.पण म्हणून प्रयत्न सोडायचा नाही.वारंवार करत रहायचं.मग मनाला लागलेली जुनी सवय गळून पडल्याशिवाय राहणार नाही. बघूया..... प्रयत्न करायला काय हरकत आहे........." ( फेसबुकात लिहायला तरी.....) - स.दा.भूतकाळे

76 likes 81 shares
WhatsApp