मी एकटी नाही रे आहे तूझ्या आठवणींचा गुंजराव मी थकली नाही रे आहे तुझ्या बाहूंचा आधार मी जेव्हा हसते रे ओठांत असतो तुझाच विचार मी रडत नाही रे आठवतात पावसातल्या कोसळणार्या सरी मी सुखी नाही रे असतो तुझ्या स्पर्शाचा आभास मी जगतेय रे क्षणाक्षणाने कर्तव्य म्हणुन मी चालतेय रे जीनववाटेवर तुझीच वाट बघत मी जपतेय रे मिलनाचे असंख्य मोती मनाच्या शिंपल्यात मी शोधतेय रे तुझ्या सहवासाच्या शिदोरीवर ही विरहवाट.....
0 likes
0 shares