Back to feed
A
Anaya Verma Life · Marathi · Life

मी एकटी नाही रे आहे तूझ्या आठवणींचा गुंजराव मी थकली नाही रे आहे तुझ्या बाहूंचा आधार मी जेव्हा हसते रे ओठांत असतो तुझाच विचार मी रडत नाही रे आठवतात पावसातल्या कोसळणार्‍या सरी मी सुखी नाही रे असतो तुझ्या स्पर्शाचा आभास मी जगतेय रे क्षणाक्षणाने कर्तव्य म्हणुन मी चालतेय रे जीनववाटेवर तुझीच वाट बघत मी जपतेय रे मिलनाचे असंख्य मोती मनाच्या शिंपल्यात मी शोधतेय रे तुझ्या सहवासाच्या शिदोरीवर ही विरहवाट.....

76 likes 83 shares
WhatsApp