Back to feed
A
Avni Iyer Life · Marathi · Life

*"मी कुणाला कळलो नाही"* 🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻 *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मला छळले नाही...* *सुगंध सारा वाटीत गेलो* *मी कधीच दरवळलो नाही..* *ऋतू नाही असा कोणता* *ज्यात मी होरपळलो नाही..* *केला सामना वादळाशी* *त्याच्या पासून पळालो नाही..* *सामोरा गेलो संकटाना* *त्यांना पाहून वळलो नाही..* *पचऊन टाकले दु:ख सारे* *कधीच मी हळहळलो नाही..* *आले जीवनी सुख जरी* *कधीच मी हुरळलो नाही..* *कधी ना सोडली कास सत्याची* *खोट्यात कधीच मळलो नाही..* *"मी कुणाला कळलोच नाही.."* *"मी कुणाला कळलोच नाही"* 🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻

68 likes 42 shares
WhatsApp