Back to feed
N
Navya Bose Love · Marathi · Missing

मी पुन्हा भेटेन .... त्याच जुन्या वळणावर नव्या वाटा शोधताना मीपुन्हा भेटेन ... .त्याच बेधुंद वाऱ्यासोबत काळाशी स्पर्धा करताना मीपुन्हा भेटेन .... त्याच बेफान लाटांसोबत आकाशाला गवसणी घालताना मीपुन्हा भेटेन .... त्याच हसणाऱ्या फुलांसोबत आनंदाचे साम्राज्य पसरवताना मी पुन्हा भेटेन .... त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत नव्याने तेजस्वी होताना मी पुन्हा भेटेन .... त्याच हळव्या आठवणींमधून नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना

0 likes 0 shares
WhatsApp