मी :- हेलो ! कुठेस तु..? किती वेळ थांबलो आहे मी इथे... . ती :- हो आलीच. पाच मिनिटे फक्त.. . ( काही वेळाने ) . ती :- अरे मी इथे आली आहे. तु दिसत नाहीये. . मी :- मी तर इथेच आहे. बस स्टॉप च्या पुढे बघ.. . ती :- अरे वेड्या मी पण इथेच उभी आहे. मग मला तु दिसत का नाही .. . मी :- अरे मुर्ख आता मला राग नको आणु.. लवकर यायचं तर ये नाहीतर मी जातो.. . ती :- कुञ्या मला तु दिसत नाहीये.. मला वेडं बनवुन दुसरी सोबत जाणार तु माहीत आहे मला... . मी :- मंद बुद्धी मी एक तास झाला शिवाजीनगर बस स्टॉप वर थांबलोय. तो कंडेक्टर पण मला बघून हसू लागलाय आता.... . ती :- तु तिथे का थांबला आहेस..? आपण तर पुणे स्टेशन ला भेटणार होतो ना...? . मी :- मुर्ख मुलगी.. तु च मला इथे बोलावलं आणि स्वतः तिकडे बसली... . ती :- मी असं नव्हतं म्हणली.. मी म्हणले की, पुणे स्टेशन वरून शिवाजीनगर ला जाऊ.... . मी :- किती खोटं बोलतेस तु.. स्वतः ची चुक कबुल करत जा कधीतरी.... . . फोन वर आमचं भांडण चालू च होतं.. तोपर्यंत ती आली मग काय पुन्हा भांडण पुढे चालु ठेवलं..
A
Ayaan Agarwal
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares