V
Vihaan Pawar
Love · Marathi · Motivation
मी_कुठे_म्हणालो " परी" मिळावी फक्त जरा "बरी" मिळावी प्रयत्न मनापासून_आहेत मग किमान एक "तरी" मिळावी! स्वप्नात_तशा_खूप_भेटतात कधीतरी खरी मिळावी... हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी!! गालावर_खळी नको तिच्या फक्त जरा हासरी_मिळावी.. चंद्रा_इतकी_सुंदर_नकोच फक्त जरा लाजरी_मिळावी!! मी कुठे म्हणालो परी_मिळावी फक्त जरा बरी मिळावी.. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं...! शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं...! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं...! होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायच नसतं....! चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!
0 likes
0 shares