मजेशीर पण मनाला पटलेली कविता *Problem of plenty* एकाच कपाटात मावत पाच जणांचे कपडे भिंतीवरच्या मांडणीत डबे, पातेली, कुंडे हल्ली मात्र सामानाने भरून वाहताहेत घरटी आवरता आवरता प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty ! फार पूर्वी नव्हतीच म्हणे चपला घालायची पद्धत नंतर घरात जेवढी माणसे, तेवढेच जोड दिसत घेतो नवे जोड हल्ली प्रत्येक ऑकेजन साठी घालू कुठले ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty ज्याच्या घरी फोन, त्याला नसे आराम लेंडलाईन एक, करी सार्यांचे काम हल्ली एका मोबाईल मध्ये तीन सीम ची घंटी घेऊ? नको? ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty घरी एक टीव्ही, एकच फक्त दिसे दूरदर्शन मोजकेच कार्यक्रम पण त्यांचे मोठे आकर्षण विश्वरूपदर्शन होते आज सर्व चैनल वरती काय पाहू ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty उंचावतो राहणीमान आपण वाढता मिळकत थोडीही गैरसोय मग मुळीच नाही खपत चिडचिड नि ताण तणावाच त्याने वाढतात शेवटी समाधान शोधता शोधता प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty कमी असतानाही घरात होते समाधान नवे काही मिळता आनंदाला येई उधाण भूतकाळाच्या आठवणींनी आपण होतो senti कालचक्राची चाके आता फिरतील का उलटी? आपल्या घरात आता problem च plenty
93 likes
16 shares