Back to feed
R
Reyansh Bagale Life · Marathi · Life

माझी तगमग माहेरी आणि सासरी सगळीकडे एकच प्रश्न अशी कशी ग तु असून नसल्यासारखी काय करावे काही कळेना दोन्ही ठिकाणी राहूनही जीव कुठेच रमेना आई म्हणते किती लवकर तिकडची झालीस मी शिकवलेलं इतक्यात विसरून गेलीस सासू म्हणते इतकी वर्षे होवून ही तुझ्या हाताला ह्या घरची चव येत नाही आई म्हणे सून माझी बरी सासू साठी तिची मुलगी च खरी माहेरी जाण्यासाठी मन माझे आसूसते पण दोन दिवसांपेक्षा जास्त तिथेही चैन पडत नाही आई मग रागवून म्हणते आता काय बाई तु तिकडचीच झालीस सासू म्हणते एवढं काय सारखं माहेरच कौतुक उठसुठ माहेरी जाण्यासाठी कारणं शोधतेस दोन्ही घरची असूनही कुठेच मी नाही मनातली तगमग कुणालाच कळत नाही दोन्ही घरची पाहुणी मी झाले आहे पण त्यांच्या सगळ्यांच्या आधारावरच मी खंबीरपणे उभी आहे. अनामिका

17 likes 11 shares
WhatsApp