Back to feed
S
Shaurya Deshmukh Friendship · Marathi · Friendship

माझी नोकरी म्हणजे ....... माझी नोकरी म्हणजे याहूनही खूप काही आहे , ती माझा मोकळा श्वास आहे , समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे , जीवनविषयक अभ्यास आहे , तो माझा आत्मविश्वास आहे , मनमोकळ्या हास्याचा तास आहे , अनुभवाचे आकाश आहे , चार भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे , तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे , घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे , कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे , म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे . (नोकरी करणाऱ्या व करत होत्या त्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी )

257 likes 86 shares
WhatsApp