माझे मन आणि आत्मा संवाद करातोय कळत नाही आज का, मन माझे भरून येत आहे, सारे सोबत असूनही महेशा का तुला एकटेपणाची जाणीव होत आहे..... खरच तू इतका वाईट आहेस कारे जे तूझे आपलेच तूला दु:ख देत आहे, आपलेपणाचा खोटा आव आणून, विरहाच्या दरीत ढकलत आहेत..... असा काय गुन्हा झाला तूझा कि पावलोपावली तूझ्या वाटेला दुखच येत आहे, खरच तू इतका कठोर आहेस कारे, कि सगळेच दगडासारखे तूला ओरबाडत आहेत..... कुणा कुणा कडून ठेवशील तू अपेक्षा, ती अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे..... कुणावर ठेवशील तू विश्वास कुणाला म्हणशील तू आपले, सगळेच वेळे नुसार बदलत आहेत..... कसा जगशील तू या निष्ठुर जगात, कि न केलेल्या पापाचीच शिक्षा तूला मिळत आहे, अजून किती सोसशील हृदयावर घाव तू, कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहेत...... अजून किती रे परीक्षा घेशील रे देवा या महेशची, सारीच स्वप्ने महेशाची अधुरी राहत आहेत, थोडी तरी कर रे कदर या महेशाची हळू हळू श्वास या महेशचे मिटत आहेत...... हळू हळू श्वास या महेशचे मिटत आहेत......
156 likes
14 shares