Back to feed
A
Aarav Malhotra Rain · Marathi · Rain

*माझी शाळा* आयते शर्ट 👕 ते बी ढगळ, चड्डीला आमच्या👖 मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!!👔 खताची पिशवी स्कूल बॅग,🎒 ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!💈 धोतराचं फडकं आमचं टिफीन,🛍 खिशात ठेवुन करतो इन!!🎎 करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा🌶 लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!!🍯 रानातला रानमेवा भारी मौज, अनवाणी पाय👣 आमचे शुज!! काट्यांच रूतणं दगडांची ठेच,🎋 कसा सोडवायचा हा सारा पेच!! मुसळधार पाऊस⛈ पाण्याचा कडेलोट, पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट!!☃ जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत,📖 शिवलेल्या वह्यांची वेगळीच गंमत!! पेन मागता✒ कांडी मिळायची, गाईड मागण्याची📒 भिती वाटायची!! केस कापण्याची✂ एकच शक्कल, गप्प बसायचे होईपर्यंत टक्कल!! 📖📚📖📚📖📚📖📚 ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏 🌹शाळा एक आठवण🌹

231 likes 64 shares
WhatsApp