Back to feed
K
Kavya Mehta Life · Mixed · General

माझ्या आईने मला नसेल शिकवले पोळी करायला पण तिने मार्ग दाखवला "आपली पोळी कमवायला" माझ्या आईने मला नसेल शिकवले साडी नेसायला पण तिने शिकवले आहे "पदर सांभाळायला" माझ्या आईने मला नसेल शिकवले दारात रांगोळी रेखायला पण तिने शिकवले आहे दारी आलेल्याचा मान राखायला माझ्या आईने मला नसेल शिकवले भरतकाम करायला पण तिने शिकवले आहे नात्यांची नाजूक वीण घट्ट ठेवायला माझ्या आईने मला नसेल वाढवले "एक मुलगी" म्हणून पण तिने मला घडवले आहे एक "व्यक्ती" म्हणून Dedicated to all lovely ladies

238 likes 42 shares
WhatsApp