माणसा होऊ नको रे बईमान..... शंभराच्या नोटीला सोन्याचा मान अरे माणसा होऊ नको रे बईमान | माणसा होऊ नको बईमान.......... अडचणीत असतांना जनता तु रे पाचशेचे दोनशे घेतोस ईनाम || मानसा होऊ नको बईमान.......... हजार गेली,पाचशे गेली झाली आपलीच जनता रे हैरान || माणसा होऊ नको बईमान........ मदतीला धावलास तर तुझे किती गातील रे गुण गानं || मानसा होऊ नको बईमान......... सुट्या पैशा साठी जनतेची हरवुन गेली भुक तहाणं | माणसा होऊ नको बईमान......... लांबच लांब रांगा लाऊन बॅंकेत जनता झाली कि रे हैरान | माणसा होऊ नको बईमान......... सारी जनता आपलीच आहे मदतीला धाऊन राख तु रे मान || माणसा होऊ नको बईमान......... मदतीला धावलास तु तर तुझ्या ऊपकाराने त्यांचे होईल रे समाधानं || माणसा होऊ नको बईमान......... आयुष्या मध्ये गरज सर्वांनाच आहे हे आता तरी तु मनापासुन रे जाणं || माणसा होऊ नको बईमान......... अडी-अडचणीला त्यांच्या धाव घेवुनी तु कर रे आपल्या जीवाचं रानं || माणसा होऊ नको बईमान......... अरे मानसा नको होऊ बईमान.....
7 likes
58 shares