Back to feed
A
Aadhya Kulkarni Life · Marathi · Life

*माणसांसाठी लढा* माझा जन्म झाला तेव्हा मी मुलगा म्हणून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद फुलला मी मुलगी असतो तर असच काहीस झालं असत सांगता येत नाही ? आईन शाळेत नाव टाकल तोवर माणूस हीच माझी ओळख होती टी.सी. वर नाव नोंदवे पर्यंत कोणताही धर्म,कोणतीही जात मला कायमची चिकटली नव्हती. शिवनापानीच्या खेळात कोणताही भेदभाव नव्हता ना अंगतपंगतीत कधी कोणी डावलले शिरखुमा पिऊन तृप्त झालो भगव्या,निळ्या रंगाच्या फुलांना मनाच्या धाग्यात ओवले. बालपणीचा वसंत असाच बहरत होता शिवाजी,महेश,गौतम, राणी, जॉनी, सुखविंदरसह नात्यांचा सुगंध दरवळत होता. आंधळीकोशंबीरीचा खेळ चालू आहे आजपण मामाच्या पञासोबत मात्र हरवलय बालपण. नजर बदलली व्यास विस्तारला जसजस वाढतय वय पृथ्ववरच्या गोलगोल वतृळातील असंख्य खंडांच आता वाटू लागलय भय. मेंदूच्या नसानसा कुरतडतात विविध रंगी विचारांचे उंदीर पाड्यापाड्यावर फडकत आहेत जातीजीतीचे झेंडे दिसत नाही कोठेच माणसांचे मंदिर. चला होऊ पुन्हा लहान मुल सोडविण्या हा तिढा आपल्यातील महापुरूष जागा करू देण्या माणसांसाठी लढा

257 likes 27 shares
WhatsApp