M
Meera Deshmukh
Love · Marathi · Friendship
मैत्रीच्या या नात्याला शब्दांत नसतं बांधायचं हि-यासारखं कोंदणात याला हळूवार जपायचं ह्दयात बसवून मैत्रीला श्वासांनी असतं फुलवायचं लटक्या रुसव्या फुगव्यांनी फक्त तीला सजवायचं नको काही देवाणघेवाण व्यवहारात का पडायचं काही झालं तरी तीला अर्ध्यात नाही तोडायचं नाही त्यात तुझं माझं फक्त आपलं म्हणायचं औपचारीक शब्दांनी का उगाच तीला दुखवायचं मैत्रीत ना मोठेपणा ना एकालाच महत्व द्यायचं सा-यांनाच सोबत घेऊन मैत्रीत चिंब भिजायचं मैत्रीत चिंब भिजायचं
0 likes
0 shares