Back to feed
N
Nisha Sharma Humor · Marathi · Humor

मित्रांनो कृपया आपली अमूल्य अशी २ मिनिटे देवून नक्कीच वाचा. हा मॅसेज थोडा मोठा आहे पण विचारपरिवर्तन करणारा आहे. 31st Dec. जवळ येत आहे. आता "तुका म्हणे ऍडमिन पार्टी देतोय का?" किंवा "तुका म्हणे न्यू इयर ची लागली आस" या सारखे मॅसेजेस सर्व वाट्सअप ग्रुप वर येतील. आणि 😂😜 अशी चिन्हे वापरून खिदळून सर्व ग्रुप वर शेयर होतील. गेली २ ३ वर्षे "तुका म्हणे" ही जणू हास्यास्पद बाब असल्यासारखे लोकं वागत आहेत. मानव जातीच्या कल्याणासाठी तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांची अशी विटंबना करताना लाज वाटली पाहिजे. तुकाराम महाराज "जगतगुरु" असून फ़क्त वारकऱ्यांचेच नाही तर संपुर्ण मानव जातीचे आदर्श ठरले. त्यांच्या अभंगांचा अभ्यास करताना आयुष्य अपुरे पडेल. १ अभंगाचे निरूपण किंवा कीर्तन कित्येक दिवस चालते. तेव्हा तो अभंग उलगडायला लागतो. आपल्या आईवडिलांबद्दल बोलल्यावर राग येतो ना. तसेच तुकोबाराय आमचे आईवडिल आहेत. म्हणून ही पोस्ट लिहिणे कर्तव्य समझतो. दुसऱ्या जातीचे लोक दिसतात का त्यांच्या देवांचा किंवा ग्रंथांचा अपमान करताना? हिंदू धर्माचे लोक स्वतःच्याच सण, देव, साधुसंत, ग्रंथ यावरून जोक्स पास करताना दिसतात. आपण असे करू नये आणि इतरांनाही करायला देवु नये,ही जबाबदारी समझावी. कृपा करा आणि हे थांबवा. 31st Dec. आल्यावर "तुक म्हणे"असे मॅसेजेस सर्व ग्रुप्स वर येतात त्याआधीच सर्व ग्रुप वर हा मॅसेज पाठवा. जेणेकरून या वर्षापासून तरी साधुसंतांची अवहेलना थांबेल. 🙏🏻मी मॅसेज करणारा एक मानव, एक हिंदू, एक वारकरी, एक मराठी माणूस, एक सुजाण नागरिक आहे. आपणही यापैकी काही ना काही आहातचना. मग पाठवा सर्व ग्रुप्स वर.

81 likes 65 shares
WhatsApp