*मित्रांनो नक्की वाचा चंद्रकोर म्हणजे काय.........!* मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर एक स्टाइल जोरदार फिरत आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटअप. जागोजागी छत्रपतींसारखी दाढी-मुछ आणि कपाळावर चंद्रकोर ठेवलेले तरूण नजरेस येत आहेत. बरयाच लोकांना ही गोष्ट खटकत असेल पण मी मात्र अशा तरूणांच कौतूक करेन . उगाच चित्रविचित्र स्टाइल पेक्षा राजांची आठवन करून देणारी स्टाइल मलातरी खूप आवडली. पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ज्या वेगाने आपण महाराजांच्या दिसण्याच अनुकरण करीत आहोत काय त्याच वेगाने आपण त्यांच्या विचारांचही अनुकरण करणार आहोत ? खरतर महाराजांनाही तेच आवडेल. महाराज हे गुणांची खाण होत. त्यांच्या एका तरी गुणावर आपण चालण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी आयुष्याच सोन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांसारखा गेटअप करणारया तरूणांना विनंती आहे की मित्रांनो नुसताच गेटअप करून फिरू नका शिवचरीत्र नक्कीच वाचा कारण महाराज त्याच्या गेटअप मुळे महान नव्हते तर ते त्याच्या कर्तृत्वाने महान होते. मित्रांनो महाराजांचा गेटअप करतांना नैतिक जबाबदारया येतात निदान सामाजिक जिवन जगतांना तरी सांभाळा .विचार करा महाराजांचा गेटअप मधिल तरूण मुलिंची छेड काढू लागले तर ? मारामारया करू लागले तर ? आई वडीलांना शिव्या घालू लागलेतर ? दारू पिऊन रस्तावर लोळु लागले तर? महाराजांच्या जिवाला कित्ती वेदना होतिल . काही दिवसा पुरवीच एक असाच महाराजांचा गेटअप केलेला तरूण माझ्या संपर्कात आला .पहाताच क्षणी महाराजांची आठवण व्हावी असा. मला तो खूप आवडलाही त्याला तसं मी म्हणालोही पण पुढे काय ? पूर्ण दिवसभर तोंड गुटख्यानं भरलं होतं नंतर मावा आणि बिअरची आँरडर देतांना त्याला जेव्हा बघितलं तेव्हा काळीज चररररर झालं. एकीकडे गडकिल्ले साफसफाई करणारे तरूणही नजरेस पडत आहेत . म्हणूनच सांगतो मित्रांनो तुमच्या शिवप्रेमाला सलाम पण सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागा . विनंती आहे मित्रांनो ,महाराजांचा गेटअप हा चेष्टेचा विषय होऊ देऊ नका. महाराजांच्या आत्म्याला दुखावण्याच काम तुमच्या हातून होऊ देऊ नका. ⛳जय जिजाऊ⛳ ⛳जय शिवराय ⛳ *⛳छत्रपती शिवाजी महाराज की जय⛳
S
Sai Deshmukh
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
198 likes
74 shares