Back to feed
A
Asha Bose Love · Marathi · Missing

मधुमास मिटत्या या पापण्यांना स्वप्नांची तुझ्या आस आहे दाटुनी उरात माझ्या मंद तुझा श्वास आहे काळोख्या रात्रीस ही चांदण्यांची बरसात आहे दरवळला चहुदिशांना रातराणीचा सुवास आहे गहिवरल्या रात्रीस या विरह तुझा आज आहे परी तुझ्या आठवणींचा अंतरी सहवास आहे कोठोनी हा येतसे बासरीचा नाद आहे की श्रवणात साठलेला आवाज तुझाच खास आहे पहाटेचा गार वारा झोंबतो अंगास आहे तुझ्याच स्पर्शाचा जणू मखमली आभास आहे

0 likes 0 shares
WhatsApp