मधूमेह नियंत्रणात ठेवायला आले खा ! मधूमेह या आयुष्यभर साथ करणार्या आजाराला नियंत्रणात ठेवायचे असल्यास आले खा,असा सल्ला ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी दिला आहे. आल्यामुळे रक्तातील साखर आरामात नियंत्रणात राहते. याचा फायदादीर्घकाळापर्यंत मधुमेहाच्या रुग्णांना मिळू शकतो.सिडनी विद्यापीठाचे संशोधक बसील रॉफगालिस म्हणाले की, रक्तातील साखर नियंत्रण करण्याची क्षमता आल्यात आहे. इन्सुलिनऐवजी मांसातील पेशींमध्ये ग्लुकोजचे प्रमाण आल्यामुळे वाढते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास सहाय्य मिळते. आल्यामध्ये ग्लुकोजची पुर्नउत्पादकता निर्माण करण्याची क्षमता असते. ( रोज 1/2 इंच . आल्याचे तुकडे करून सैवंध मिठ व हळद लावून वाळवा व रोज 1-2 तुकडे सकाळ संध्या. ) आल्यामुळे प्रोटीन `जीएलयूटी4′ चा पुरवठय़ात वाढ होते. हे प्रोटीन मांस पेशीच्या पृष्ठभागावर असते. `प्लँटा मेडिका’ या जर्नलमध्ये ही माहिती दिली आहे.
A
Asha Verma
Friendship · Marathi · Friendship
97 likes
10 shares