Back to feed
K
Kiara Mehta Love · Marathi · Missing

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला? 🌷💓🌷💓🌷💓🌷💓🌷 जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला? कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास काट्यांतच मग खुडावं लागतं..... कुणाला कुणी असं सोडुन का जातं? 🌷💓🌷💓🌷💓🌷💓🌷 होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं बरसतानाच नकळत हरवुनही जातं भर चांदरातीही मनास मग एकट्यालाच झुरावं लागतं... कुणाला कुणी असं सोडुन का जातं? 🌷💓🌷💓🌷💓🌷💓🌷 कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये वाळवंटी या जगात एकट्यालाच मग जगावं लागतं... कुणाला कुणी असं सोडुन का जातं? 🌷💓🌷💓🌷💓🌷💓🌷 मी जगुन घेतो एकटा माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं... कुणाला कुणी असं सोडुन का जातं? 🌷🌷🌷💓💓💓🌷🌷🌷

0 likes 0 shares
WhatsApp