Back to feed
S
Saanvi Pawar Friendship · Marathi · Friendship

मानसाचं जीवन हे निसर्गासारख असतं, निसर्गाप्रमाणेच ते चक्र बदलत राहतं. कधी सुखाचे पावसाळे तर दुःखाचे उन्हाळे असतात, सुखात जवळ येतात मात्र दुःखात सगळे निघुन जातात. चक्र कुठलेही असो, मैत्रीच रोपटं एकटच वाढत जातं, सुखात डौलाने नाचत तर दुःखात मायेची सावली देतं. पण देव जाणे, ते ही का कधी-कधी उलमडून पडतं, उलमडून ही ते परत फुटतच जातं, नकळत वाढतच जातं. जगातून जाताना कुणी काय घेऊन जातं, मित्र हा जातानाही परिसाप्रमाने आयुष्याच सोनं करून जातो. जीवनाच्या वाटेवर अशी मैत्री व असा मित्र मिळतो, यासाठी नशीबचं लागत.

127 likes 87 shares
WhatsApp