Back to feed
A
Ayaan Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान जर कोणी केले असेल तर पवार कुटुंबीयांनी. शरद पवार साहेबांनी आपल्या राजकीय सोयीनुसार नेहमी भूमिका बदलल्या आहे. तरी आता मराठा समाजातील कोणत्याही पुढाऱ्यांच्या बोलघेवड्या पणाला, भुलथापांना मराठा समाजाने बळी पडू नये. कारण यांच्या दहा पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांनी मराठयांच्या जीवावर कमावला आहे. शैक्षणीक क्षेत्रातील आर्थिक तफावत, नोकरी व इतर अनेक मागण्या समाजाच्या आहेत. मराठ्यांच्या जीवावर सत्ता मिळवायची व नंतर दाखवायचा ठेंगा. शरद पवारांनी ठरवले असते तर मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळाले असते. पण त्यांनी मराठा समाजाला झुलवत ठेवले व इतर समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या कारण आपल्या राजकीय सोयीसाठी, स्वतःच्या भावी पिढीसाठी,नातेवाइकांसाठी. काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे,भाजपा या पक्षात जे मराठा आहेत त्यांचे फक्त पक्ष वेगळे पण पक्षाच्या धोरण नुसार काम करतांना मराठा आप आपसात भांडतो. कधीतरी एकत्र या! राजकीय जोडे बाहेर ठेवा,आर्थिक दरी यात भेद न करता समाजासाठी मन मोकळे पणाने काम करा.आता बऱ्याच स्वयंघोषित मराठ्या नेत्यांना समाजाचा पुळका आला आहे ,कारण स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे. पवारां सारखे बरेच नेते मुख्यमंत्र्या कडून (मराठा समाजाच्या वतीने) केव्हा बोलावणे येते याची वाट पाहत आहेत. पण मुख्यमंत्र्यांनाही माहित आहे मराठा क्रांती मुक मोर्चाचे नेतृत्व सकल (सर्व सामान्य) मराठा समाज करीत आहे. मराठा समाजाला गृहीत धरून राजकारण करणे सोडा. यांच्या सारख्या स्वार्थी मराठा राजकारण्यांना कायमचे घरी पाठवून निस्वार्थी मराठा नेतृत्व तय्य्यार व्हावे हीच या मराठा क्रांती मुकमोर्चाच्या निमित्ताने माझ्या सारख्या सर्व सामान्य मराठ्याची इच्छा आहे. आताची तरुण पिढी भावनिक आव्हानाला न जुमानता परिस्थिती नुसार लढते व सक्षम आहे आरपार लढाई लढण्यासाठी.आता सर्व सामान्य मराठा तय्यारी निशी उतरला आहे कारण यांच्या सारख्या राजकारण्यांनी मराठा समाजाला रस्त्यावर आणले आहे. !! जय जिजाऊ जय शिवराय , जय मराठा !!

192 likes 8 shares
WhatsApp