S
Sara Bose
Good_Night · Marathi · Romantic
मला आवडलेले काही सुंदर क्षण.. तुम्हाला आवडले का सांगा पाहू ..?!!!! रविवार पेक्षा शनिवार संध्याकाळ जास्त आवडणारी असते ! चहा प्रत्यक्ष पिण्यापेक्षा , लांबून येणाऱ्या कपबशी च्या सूचक आवाजात जास्त मजा असते....! प्रिय व्यक्ती प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा , ती भेटण्याची शक्यता , निर्माण झाल्यावरची अधीरता जास्त मोहक असते.....! कोणतीही मोठी गोष्ट उदा. घर, गाडी, गॅजेट्स ही प्रत्यक्ष हातात येण्याआधी , ती विकत घेण्याची क्षमता आणि घेण्याचा झालेला निर्णय जास्त सुखद असतो....! थोडक्यात सुख प्रत्यक्ष मिळत असण्याच्या क्षणापेक्षा सुख मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतरची अवस्था ही जास्त लोभस असते ....! || शुभ रात्री ||
238 likes
30 shares